उमरखेड महागाव तालुक्यात 16 ते 19 ऑगस्ट आणि नंतर परत 28 ऑगस्ट रोजी झालेल्या प्रचंड प्रमाणातील अतिवृष्टीने शेतकरी कमालीच्या हातबल झाला आहे. यात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले असून तात्काळ मदत मिळावी या मागणीसाठी काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.