राधा कृष्ण गणेश मंडळ येथे विविध मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. यामध्ये माजी न्यायमंत्री/ पालकमंत्री व सध्याचे आमदार राजकुमार बडोले, पं.स. उपसभापती रामेश्वर महारवाडे, माजी पं.स. सभापती मनोज बोपचे यांचा समावेश होता. या विशेष भेटीत मंडळाचे कार्याध्यक्ष राजाभाई खान यांनी मान्यवरांचे स्वागत केले व मंडळाच्या कार्याची माहिती दिली. मान्यवरांनी मंडळाच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याची स्तुती करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.