ठाणे शहर पोलिसांच्या वतीने नवा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11च्या सुमारास देण्यात आली आहे. ठाणे शहर पोलिसांनी नवा व्हाट्सअप चॅटबोट सुरू केला आहे. या चॅटबोटच्या माध्यमातून जलद सेवा, पारदर्शक माहिती आणि ठाणेकरांना नावे डिजिटल पोलिसिंग उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी माहिती दिली आहे.