जळगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीची धामधूम सुरू असताना, रविवारी ७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास दुध फेडरेशन रोड नजीक असलेल्या एका पेट्रोल पंपाच्या बाजूला अचानक आग लागल्याची घटना घडली. वेळीच लक्ष दिल्यामुळे मोठी हानी होण्यापासून वाचली आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल साठे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले आणि आग आटोक्यात आणली.