मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठ्या उत्सवापैकी एक असलेला ईद - ए - मिलाद सर्वत्र उत्साहात साजरा होत असून यानिमित्त सम्राट मुस्लिम मंच च्या वतीने इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या १५०० वी जयंती अर्थात ईद-ए-मिलाद नाशिकच्या नांदगाव शहरात पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली.शहरातील मुस्लिम बहुल भागात ठिकठिकाणी सजावट तसेच मुस्लीम बहुल भागात उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले.या वेळी शहरातून प्रमुख मार्गाने जुलूस काढण्यात आला या जुलूस मध्ये लहान बालके,तरुण ,जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते