बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी अनेक आंदोलने सुरू आहेत.या आंदोलन स्थळी आ. संदीप क्षीरसागर यांनी सोमवार दि 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता भेट दिली. त्यांनी आंदोलकांच्या मागण्या समजून घेतल्या.यानंतर आमदार क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आंदोलकांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडले. आंदोलक आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.