सोलापूर शहरातील लष्कर परिसरातील नळ बाजार चौक येथे रविवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. एकाच घरातील पाच जण सकाळी 11 वाजता राहत्या घरी बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. राजमोहनसिंह बलराम वाले (वय 33), वंदना राज बलराम वाले (वय 25), विमलबाई मोहनसिंह वाले (वय 52), हर्षराज बलराम वाले आणि अक्षता राज बलराम वाले अशी बेशुद्धावस्थेत सापडलेल्यांची नावे आहेत. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.