सांस्कृतिक कार्य विभागाकडून सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना अनुदान दिले जाते. २०२५ पासून गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून दर्जा देण्यात आला आहे. गणेशोत्सव या राज्य महोत्सवांतर्गत भजनी मंडळांना भांडवली अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली आहे. राज्यातील १८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी २५ हजार रुपये भांडवली अनुदान दिले जाणार आहे.