संगमनेर बाजारपेठ गणेशमय; मूर्ती, सजावटीच्या साहित्याने फुलली पेठ उद्या लाडक्या गणरायांचे आगमन होत असल्याने संगमनेर शहरातील बाजारपेठ गणेश मूर्ती, सजावटीचे साहित्य आणि रोषणाईने फुलून गेली आहे. शहरातील विविध लहान-मोठ्या मंडळांनी भव्य मंडप उभारणीस सुरुवात केली असून पेठेमध्ये आकर्षक पानाफुलांच्या माळा, तोरण, रंगीबेरंगी लाईट्स, विद्युत रोषणाईचे साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे.