खेड तालुक्यातील चिंचघर रेवचीवाडी येथे बस स्टॉपच्या पाठीमागे गावठी हातभट्टीची दारू विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्यावर पोलिसांनी १४ एप्रिलला रात्री कारवाई केली. यावेळी पोलिसांनी आरोपीकडून चार हजार दहा रुपयांची गावठी दारू जप्त केली. याप्रकरणी अशोक पांडुरंग सुर्वे याच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.