जालन्यात भोकरदन नाका परिसरातील आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, घटनेनं एकच खळबळ... आज दिनांक सहा शनिवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. शहरातील भोकरदन नाका परिसरात ही घटना घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती स्थानिकांनी तातडीने सदर बाजार पोलिसांना दिली. माहिती मिळताच सदर बाजार पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मयताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आ