घराला कुलूप लावून देवदर्शन फिरायला गेलेल्या कुटुंबीयांच्या घरी सुना-मोका पाहून चोरट्याने ९८ ग्रॅम सोन्याचे ७ लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले.ही घटना माणेगाव सडक येथे उघडकीस आली.याप्रकरणी लाखनी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.मानेगाव-सडक येथील सविता प्रकाश खेडीकर या पंचायत समिती भंडारा येथे तालुका अभियान व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. त्या मानेगाव सडक येथे पती व मुलांसह वास्तव्यास आहेत.बुधवार, २० ऑगस्टला त्या कार्यालयात गेल्या.