बुलढाणा वन विभागाच्या पथकाने शेळगाव आटोळ ते अंचरवाडी रस्त्याजवळ रविवारी धाड टाकली होती.घटनास्थळी काही जण काळवीटाचा मास विक्री करीत असल्याचे दिसून आले होते.पथकाला पाहुन शिकारी पळून गेले.1 कापलेला व 1 जिवंत काळवीट,1 मोटरसायकल, काळवीटाचे 4 चामडे व इतर साहित्य जप्त करण्यात आले होते.चिखली कोर्टाच्या आदेशाने जप्त केलेला मास जाळून नष्ट करण्यात आला तर जिंवत काळवीटाला ज्ञानगंगा अभयारण्यात सुखरूप सोडण्यात आले.