नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध दारू धंद्याविरुद्ध धडक मोहीम एकूण 25 हजार पाचशे रुपयांचा दारूचा साठा जप्त केला असल्याची माहिती तालुका पोलिसांनी आज सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी चार वाजता दिली आहे. पंढरपूर तालुका पोलिसांनी नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलिस ठाणे हद्दीतील खर्डी, कासेगाव, देगाव, रांजणी, पुळुज या ठिकाणी अवैध दारू विरुद्ध कारवाई केली. यात एकूण देशी विदेशी कंपनीची 25 हजार 500 रुपयाची अवैध दारू पोलिसांनी जप्त केली.