खेडशी गावातील डफळचोळवाडी गावारेड्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी व ग्रामस्थ हेराण झाले आहेत. हे गवे रात्री अपरात्री शेतात घुसून भात शेती व फळबागाचे मोठे नुकसान करत आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. दिवसाढवल्याही गव्यांचा कळप गजबजलेल्या वस्तीजवळी फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भेटीचे वातावरण आहे.