मुखेड तालुक्यातील जांब बुद्रक येथे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण दि.१८ रोजी ६ वाजता आले असताना त्यांनी भाषण सुरू करताच मराठा आंदोलकांनी ते भाषण रोकले व मराठा आरक्षणा संदर्भात जाब विचारला. या दरम्यान काही काळ तणाव निर्माण झाला. यावेळी प्रताप पाटील चिखलीकर, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार डॉ . तुषार राठोड यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच अशोकराव चव्हाण जांब बु येथे आले होते.