जालना शहरतील कदीम पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसापासून एक लाल रंगाचे चारचाकी वाहन बेवारस अवेस्थेत आढळून आले आहे. त्यामुळे कदीम जालना पोलीसांनी वाहन मालकाचा शोध सुरु केला असल्याची माहिती सोमवार दि. 1 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता पोलीस सुत्रांनी दिलीय. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कदीम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मुक्तेश्वर वेशीजवळ दि. 28 ऑगस्ट 2025 पासून एक लाल रंगाची आणि विना क्रमांकाची कार उभा आहे. कारचा मालक तीला नेत नसल्याने कार बेवारस असल्याची माहिती मिळत आहे.