ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे आज शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी जाहीर केले. आज सांस्कृतिक विभागातर्फे तज्ञांसोबत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी बैठक घेऊन बारव संवर्धन, संरक्षण याबाबत आढावा घेतला. ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि पुराणकाळापासून ज्यांच्या नोंदी सापडतात अशा ३,००० च्या वर बारव आहेत.