शहादा शहरात अतिथी सभागृहात आज मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेला शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री सोनवणे जयनगर चे सरपंच ईश्वर माळी बामखेडा गावचे सरपंच मनोज चौधरी यशदाच्या मार्गदर्शक नीता पाटील यांच्यासह विविध गावातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्राम विस्तार अधिकारी आदी उपस्थित होते.