धामणगाव बढे परिसरात सध्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार झपाट्याने वाढत असून, हॅकर्सनी आता एक नवी शक्कल लढवली आहे. भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या नावाने बनावट पीडीएफ रिवार्ड फाइल पाठवून नागरिकांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केले जात आहे. ही घटना धामणगाव बढे परिसरात मोठ्या प्रमाणावर घडत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी बनावट लिंक पासून सर्तक राहावे असे आवाहन धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे ठाणेदार नागेश जायले यांनी केले आहे.