मंगळवेढा तालुक्यातील ढवळस गावात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत ११ वर्षीय चिमुकल्याचा जीव गेला आहे. योगीराज जगन्नाथ हेंबाडे असे या दुर्दैवी बालकाचे नाव असून रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या जीर्ण घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्याला तातडीने पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय उपचार सुरू असताना सोमवारी (दि. २२ सप्टेंबर २०२५) सकाळी आठ वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला.