अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री गौरी नलावडे यांची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट 'वडापाव' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या आगामी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास टेंभी नाका येथे दुर्गेश्वरी देवीचे दर्शन घेतले. देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी संपूर्ण टीम आज ठाण्यात दाखल झाली होती. यावेळी प्रसाद ओक आणि गौरी नलावडे यांच्यासह चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि तांत्रिक टीमचे सदस्य उपस्थित होते.