पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांच्या धडाक्यामुळे देशातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत .असे प्रतिपादन आज खासदार धनंजय महाडिक यांनी भुदरगड तालुक्यातील भाटिवडे व महालवाडी येथे विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी काढले. विकास कामांच्या मुळे ग्रामीण भाग शहरासारखा दिसत आहे .यापुढे दहा वर्षानंतर खेडी शोधावी लागतील असे ते म्हणाले. खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून 25 लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. भाटिवडे भुमकरवाडी रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा पार पडला.