धुळे शहरात सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज आणि फटाके फोडल्यासारखा आवाज करणाऱ्या बुलेट चालकांच्या मुजोरीला चाप लावण्यासाठी धुळे शहर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या आदेशानुसार, शहरातील विविध भागांत केलेल्या धडक कारवाईत आतापर्यंत दहा बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत.