आज गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास दहिसर टोल नाक्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व आमदार मनीषा चौधरी यांनी पाहणी केली. या निर्णयासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करत आलो. अधिवेशनात आवाज उठवला, नागरिकांचा आवाज पोहचवला आणि अखेर या प्रश्नाला न्याय मिळाला. असे देखील आमदार मनीषा चौधरी म्हणाले. यावेळी परिवहन खात्याचे अधिकारी, पोलीस अधिकारी, भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.