संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या विधानावर आज बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, समस्या ही आहे की संघ आणि भाजप इतिहास कसा विकृत करतात. आपण नेहमीच पाहिले आहे की असंख्य स्वातंत्र्यसैनिक, मंगल पांडे, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत प्रचंड योगदान आणि बलिदान दिले.