परांडा येथील राम पवार यांचा पैशाच्या कारणावरून बहीण व मेहुण्याने खून केल्याचा आरोप आईने केला आहे. ही घटना मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे हाती. दफन विधीसाठी जमीन उपलब्ध असल्यामुळे चार तास मृतदेह तहसील कार्यालयासमोर ठेवण्यात आला त्यानंतर तहसील कार्यालयाच्या वतीने त्यांना जागा उपलब्ध करून दिल्यानंतर मृतदेह दफनविधी करण्यात आला आहे. ही घटना दहा नोव्हेंबर रोजी तीनच्या सुमारास घडली.