समुद्रपुर:तालुक्यातील कोरा येथे वर्धा येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोळ्याच्या सणा निमित्ताने दारू विक्रीसाठी आणलेल्या विक्रेत्यावर कारवाई करीत ४ लाख २५ हजार रुपये ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. प्राप्त माहितीनुसार वर्धा येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला कोरा येथील रहिवासी किशोर पोहणकर याने आपल्या घरात पोळ्याच्या सणा निमित्ताने विक्रीसाठी दारूसाठा साठवून ठेवण्याची गुप्त माहिती मिळताच पथकाने याठिकाणी धाड टाकून घराची झडती घेतली असता घरात दारू साठा आढळून आला.