रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी रिपब्लिकन सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आज गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास मुंबईत शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. साधारण महिन्याभरापूर्वी शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांच्या युतीची घोषणा झाली होती. त्यानंतर आज पहिल्यांदाच आनंदराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत एकनाथ शिंदे यांच्यासोबत सविस्तर बैठक पार पडली.