पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 30 ऑगस्ट ला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार पेट्रोलिंग दरम्यान एमडी तस्कराला पाच पावली पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून साडेचार ग्राम एमडी जप्त केली आहे. याप्रकरणी आरोपीच्या फरार साथीदाराचा शोध पोलीस घेत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आहे.