मालवणच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी गणेश टेमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धडक कारवाई करीत मालवण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरील समुद्रात अकरा वावाच्या आत मध्ये बेकायदेशीर मच्छीमारी करणाऱ्या रत्नागिरीचे तीन पर्ससीन ट्रॉलर पकडले आणि कारवाईसाठी देवगड बंदरात आणले आज मंगळवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजल्या पासून त्या ठिकाणी ट्रॉलरवर कारवाई करण्याचे काम सुरू आहे.