शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने गट ‘क’ संवर्गातील अनुकंपा उमेदवारांसाठी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात शिफारस प्राप्त उमेदवारांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरूवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता नागरी सेवा मंडळाची बैठक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने नियुक्ती आदेश देण्यात आले.