अक्कलकोट तालुक्यात शुक्रवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाण्याचा प्रचंड वेगाने प्रवाह सुरु असल्याने कलहिप्परगे ते करजगी मार्ग पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद केला आहे. तसेच शुक्रवारी रात्रभर पडलेल्या जोरदार पावसामुळे हंजगी-वळसंग-कर्जाळ रस्ता देखील बंद करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापरण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन अक्कलकोट पोलिसांकडूनही करण्यात आले आहे.