नाशिक आदिवासी आयुक्त कार्यालय येथे 60 दिवसांपासून आदिवासी विकास विभागामध्ये काम करणाऱ्या वर्ग तीन, चार रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. प्रशासन सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार विनोद निकोले यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांची भेट घेतली. आंदोलकर्त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघत नाही, तोपर्यंत नवीन भरती करण्यात येऊ नये अशी मागणी यावेळी आमदार निकोले यांनी केली.