दारव्हा तालुक्यातील डोल्हारी (देवी) येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे नाराजी व्यक्त करत आज उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग, दारव्हा येथे दी. १३ जूनला स. ११ वा.निवेदन सादर केले. दारव्हा ते डोल्हारी मार्गावरील खोपडी (बु.) ते डोल्हारी (देवी) या ४ किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, हा मार्ग प्रवासासाठी धोकादायक बनला आहे. गावकरी, शाळकरी मुले, ऑटो रिक्षा, एस.टी. बस आणि दुचाकी वाहनचालकांना या रस्त्यावरून ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.