कवठे येमाईमध्ये एक विचित्र अपघात घडला आहे. महिंद्रा कंपनीच्या एक्सयुव्ही 400 कारला अपघात झाला आहे. ही गाडी इलेक्ट्रीक होती. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील बस स्थानकानजिक आज सकाळी साडे सातला हा अपघात झाला असून अपघातातून या गाडीचे मालक थोडक्यात बजावले आहेत.