Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 28, 2025
मराठा आंदोलक मनोज पाटील जरांगे हे मुंबईला रवाना झाले आहे मुंबईला आझाद मैदानावर 29 ऑगस्ट रोजी पोहोचल्यानंतर जरांगे हे आंदोलनाला सुरुवात करणार आहेत दरम्यान या आंदोलनाच्या स्टेजचे काम गुरुवारी दुपारच्या सुमारास आझाद मैदान येथे सुरू करण्यात आले यासाठी वैजापूर येथील मराठा सेवकांनी भूमिपूजन करून याचे काम सुरू केले यावेळी मराठा सेवकांनी जोरदार घोषणाबाजी ही केली.