संगमनेरात बांधकाम कामगारांचा सन्मान : गृह उपयोगी वस्तू संच वाटप संगमनेर : महाराष्ट्र शासन कामगार विभाग व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या सहकार्याने मातोश्री लॉन्स येथे बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संच (भांडी) वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.कष्टकरी बांधकाम कामगारांच्या श्रमांना योग्य सन्मान देत महायुती सरकार त्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आज दुपारी तीन वाजता करण्यात आले.