नालासोपारा रेल्वे स्थानकात दोन तरुणांनी दारू पिऊन धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून दोन तरुण नालासोपारा रेल्वे स्थानकात उतरले. त्यानंतर रेल्वे स्थानक परिसरातच दारू पिऊ लागले ही बाब आरपीएफ आणि होमगार्ड पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तरुणांना हटकले असता दारूच्या नशेतील या तरुणांनी शिवीगाळ केली व रेल्वे स्थानक परिसरात धिंगाणा घातला. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.