कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 30 ऑगस्टला सकाळी साडेअकरा वाजता पासून स्व. घनश्यामराव किंमतकर सभागृह रामटेक येथे रानभाजी महत्वाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्ल्यार्पण करुन करण्यात आले. रानभाजी महोत्सवात एकूण 49 स्टाल शेतकरी बांधव, महिला शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याकडून लावण्यात आले होते.