मागील आठवडाभरापूर्वी भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती मात्र त्यानंतर तब्बल आठवडाभर पाऊस बरसलाच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तापमानात कमालीची वाढ झाली होती तर जिल्ह्यात लागवडीखालील भात पिकांना पाण्याची गरज भासत होती. अचानक २८ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील नागरिकांना अवकाड्यापासून दिलासा तर भात पिकांना नवसंजीवनी मिळाली असल्याचे बोलले जात आहे. २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली.