केंद्र सरकार ने वस्तू व सेवा करात केलेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सुधारणेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, देशाच्या व्यापार क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फायदा होऊन, नवीन रोजगार निर्मिती होईल, सर्वसामान्य जनतेवरचा बोजा कमी होईल असा विश्वास आज सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते जफर इस्लाम यांनी सोमवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.