सेलू शहरात ईद मिलाद उन-नबी (मिलाद-उल-नबी) पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ता. 5 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता रॅली काढून उत्साहात व शांततेत साजरी करण्यात आली. शहरातील मुस्लिम बांधवांनी विविध झाक्यांची आकर्षक कलाकृती करून पारंपरिक जुलूस काढला. डीजेच्या तालावर सजवलेल्या झाक्या आणि धार्मिक घोषणाबाजीने संपूर्ण शहर दुमदुमून गेले. दुपारी 12.30 वाजता उत्सवाचे रॅलीचा समारोप करण्यात आला.