डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला मुंबईतील चैत्यभूमीवर जाणाऱ्या अनुयायांसाठी बीड ते मुंबई विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने सोमवार दि 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता केली आहे.जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बीडहून दरवर्षी हजारो अनुयायी मुंबईला जात असले तरी थेट रेल्वे सुविधा नसल्याने अडचणी निर्माण होतात. अनुयायांसाठी सोयीसाठी ही सेवा तात्काळ सुरू करावी