साकोली येथील गडकुंभली रोडवरील आदिवासी मुलांच्या वस्तीगृहाच्या मागे असणाऱ्या नालीत मंगळवार दि. 26 ऑगस्टला दुपारी चार वाजता परिसरातील नागरिकांना मृतदेह आढळून आला.पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी आवाहन करण्यात केले असता हा इसम एकोडी किन्ही येथील सुनील बडोले वय 42 असल्याची ओळख पटली असून साकोली उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह पोस्टमार्टम साठी आणण्यात आला असून साकोली पोलीस ठाण्यात मृत्यूचा मर्ग दाखल करण्यात आला आहे