शिरपूर तालुक्यातील थाळनेर ग्रामपंचायतची ग्रामसभा विविध विकासात्मक तसेच लोकहिताच्या मुद्द्यांवर चांगलीच गाजली. या सभेचे अध्यक्षस्थान सरपंच सौ. मेघा संदीप निकम यांनी भूषवले. सदर ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयात 30 ऑगस्ट रोजी घेण्यात आली.या ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी भिला निकम यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग व परिपत्रक वाचन करून दाखवले.थाळनेर ग्रामसभेत मागील जमा-खर्चास मंजुरी देऊन विविध विकासकामांना गती देण्याचे ठरले.