खेड येथे भरणे नाका परिसरात आज सायंकाळी घडलेल्या भीषण अपघाताने एकाचा बळी घेतला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. भरधाव वेगात धावणाऱ्या बलकर कंटेनरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार शांताराम गोरीविले (रा. खेड तालुका) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा सहकारी शांताराम तांबट हा गंभीर जखमी झाला आहे. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार चाकाखाली सापडल्याने त्यांचा चेहरा चेंदामेंदा झाला होता