संभाजीनगर: २२ वर्षीय तरुणीने कुटुंबीयांना कॉल केला. तेव्हा तुमच्या मोबाईल नंबरवर एक कॉल येईल, तो तुम्ही ब्लॉकलिस्ट मध्ये टाका, त्याचा कॉल घेऊ नका असे तिने सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांच्या नंबरवर २५ वेळा अनोळखी कॉल आले. त्यानंतर मम्मी दादा आजी आजोबा मला माफ करा माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल अशा आशयाची सुसाईड नोट लिहून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.