अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यातून म्हशीला बाहेर काढत असताना एक वृध्द पुरामध्ये वाहून गेल्याची घटना घडली होती.यातील वृद्धाचा मृतदेह दोन किलोमीटर अंतरावर आढळला.अर्जुन उईके असे मृताचे नाव आहे या घटनेची माहिती नायगाव ग्राम महसूल अधिकारी एम पी मसराम यांनी बाभूळगाव तहसील कार्यालयाला सादर केली.