मलकापूर शहरातील श्रीराम कॉलनी येथील निकीता कार्तिक गोरे यांची ३१ ऑगस्ट रोजी रात्री दरम्यान गळ्यातील सोन्याची पोथ किंमत १ लाख २६ हजार अज्ञात दोन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती.याप्रकरणी मलकापूर शहर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरणगाव येथून अब्बास इबादात शेख (अली) ईराणी, साहील हुसैन मोहम्मद ईज्ज अली जाफरी यांना अटक केली आहे.